कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
संपूर्ण देशात उन्हाळ्याने कहर केलाय. तापमान 45° c च्या वर पोहोचले असून हवामान खात्याने काही राज्यांमध्ये उष्णतेचा रेड अलर्ट जारी केला आहे . राजस्थान सह अनेक राज्यांमध्ये हीट वेळचा धोका वाढला आहे. त्यामुळे नागरिकांनी सावध राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत आहे. सकाळी नऊ वाजल्यापासून उन्हाचे चटके बसत आहे. परिणामी, वाढत्या तापमानामुळे नागरिकांच्या अंगाची लाही होऊ लागली आहे. उष्माघाताबाबत आरोग्य विभागाने जनजागृती करण्यास सुरुवात केली असली तरीही जनजागृती ग्रामीण भागात पोहोचलेली नाही. उष्माघाताची विषयी जनजागृतीसाठी सूक्ष्म नियोजन गरजेचे आहे. गृहिणी, शेतकरी, कामगारापर्यंत उष्माघाताची माहिती पोहोचवणे आवश्यक आहे. उष्माघातात शरीरांचे तापमान 40 डिग्री सेल्स वर पोहोचल्यास तीव्र डोकेदुखी, मळमळणे, उलटीचा भास होणे, चिंता वाटणे, चक्कर येणे, हृदयाचे ठोके वाढणे, धडधडणे ही लक्षणे दिसतात. उष्णतेच्या लाटेमुळे सतत झोप, थकवा ही सुद्धा लक्षणे दिसतात. लहान मुलांनी आहार घेण्यास नकार दिला किंवा चिडचिड, लघवीचे प्रमाण कमी, तोंडाची त्वचा कोरडी होणे अशी लक्षणे दिसल्यावर काळजी घ्यावी.उष्णतेची लाट येते तेव्हा उष्माघात होण्याचे प्रमाण वाढते. भौगोलिक स्थिती नुसार उष्णतेचे निकष भिन्न असतात
भारतीय हवामान खाते रंग कोडद्वारे म्हणजेच यलो, ऑरेंज आणि रेड अलर्ट या द्वारे नागरिकांना याची सूचना देते. उष्णतेचा परिणाम कसा असेल आणि त्यावर किती काळजी घ्यावी लागेल यासाठी रंगाच्या आधारे अलर्ट देतो.
यलो अलर्ट – सर्वात आधी प्राथमिक सूचना असते. म्हणजेच हवामानातील बदलामुळे धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. पण तो तात्काळ किंवा गंभीर स्वरूपाचा नसतो. या अलर्ट सतर्क राहण्याचा सल्ला दिला जातो. उन्हाळ्यात यलो अलर्ट अशा ठिकाणी दिला जातो तेथे तापमान 35 ते 40° c राहण्याची शक्यता असते .अशा ठिकाणी नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, पुरेसं पाणी प्यावं आणि थेट उन्हात जाणे टाळावे.असे आवाहन केले जाते.
ऑरेंज अलर्ट – ही दुसऱ्या पातळीची आणि अधिक गंभीर सूचना असते. यामध्ये हवामान खाली तापत आणि धोकादायक होण्याची शक्यता अधिक असते. तर आपण 43 ते 45 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीरातील अशक्तपणा यांसारखे त्रास होऊ शकतात. या अलर्ट मध्ये अनावश्यक बाहेर जाणे टाळावे. पांढरा किंवा हलक्या रंगाची सुती कपडे वापरावीत. डोकं झाकूनच बाहेर जाणे आवश्यक असते.
रेड अलर्ट – सर्वात गंभीर सूचना. या अलर्ट चा अर्थ असा की, अत्यंत तीव्र उष्णते मुळे जिवितहानी होण्याची शक्यता असते. रेड अलर्ट तापमान ४५ अंशापेक्षा जास्त असताना जाहीर केला जातो. त्यावेळी कोणतेही कारणास्तव घराबाहेर जाणे टाळणं आवश्यक असते. उन्हाचा परिणाम मेंदूवर हृदयावरण आणि शरीरातील पाण्याच्या पातळीवर होतो. म्हणूनच हा अलर्ट खूप गंभीरपणे घ्यावा लागतो.
उष्णतेसाठी बाचावसाठी महत्त्वाचे आहे
दुपारी बारा ते चार घराबाहेर जाणे टाळा म्हणजेच थेट उन्हापासून बचाव करा, हलक्या रंगाचे आणि सुताच्या कपड्यांचा वापर करा, डोकं झाकूनच बाहेर पडा, डोक्यावर कपडा, टोपी किंवा छत्रीचा वापर करा, दररोज तीन ते चार लिटर पाणी प्या, लस्सी, ताक, लिंबू, पाणी यांचा समावेश करा. शक्यतो दुपारच्या वेळेत बाहेर जाणे टाळावे, शक्यतो, थंड पाण्याने अंघोळ करा, पार्क केलेला बंद वाहनात लहान मुले पाळीव प्राण्यांना ठेवू नका.अस्वस्थ वाटल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या, सुरक्षित रहा आणि उन्हाळ्यात योग्य काळजी घ्या, हवामान खात्याच्या सूचनांचे पालन करा.
शुक्रवारच्या आकडेवारीनुसार तापमान
चंद्रपूरमध्ये ४१.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, ज्यामुळे ते केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील सर्वात उष्ण ठिकाणांपैकी एक बनले. इतर स्थानकेही मागे नव्हती, ब्रम्हपुरी (४१.२ अंश सेल्सिअस), सोलापूर (४१.१ अंश सेल्सिअस) आणि वर्धा (४१ अंश सेल्सिअस) यांनी ४१ अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला.
भारतीय हवामान विभागाने दिलेला माहितीनुसार समुद्र किनाऱ्याजवळच्या प्रदेशात सलग दोन दिवस 37° c पेक्षा जास्त कमाल तापमान असेल किंवा सलग दोन दिवस तापमानात नेहमीपेक्षा 4.5° अधिक वाढ झाली तर उष्णतेची लाट असल्याची ओळखली जाते.