१३ मार्च हा दिवस विश्व किडनी दिवस म्हणून पाळला जातो. याचा हेतु लोकाना किडनीचे महत्व व कार्य कळणे व किडनीच्या रोगावर वेळेत उपचार व्हावेत हा आहे. मानवी किडनी (मूत्रपिंड) शरीरातील एक महत्त्वाचा अवयव आहे.
स्थान:
- किडनी पाठीच्या बाजूला, छातीच्या पिंजऱ्याच्या खाली, पाठीच्या कण्यांच्या दोन्ही बाजूंना असतात. त्या घेवड्याच्या दाण्यासारख्या आकाराच्या व गडद लाल रंगाच्या असतात.
- आतील रचना:
- किडनीमध्ये नेफ्रॉन नावाचे सूक्ष्म फिल्टरिंग युनिट्स असतात.
- नेफ्रॉन रक्तातील कचरा आणि अतिरिक्त द्रव काढून टाकतात.
- मूत्रवाहिनी (युरेथ्रा) नावाची एक नळी प्रत्येक किडनीमधून मूत्राशयाकडे जाते.
- किडनीची आतील रचना:
- कॉर्टेक्स (Cortex):
- हे किडनीचे बाह्य थर आहे. यात नेफ्रॉन (nephrons) नावाचे सूक्ष्म फिल्टरिंग युनिट्स असतात.
- मेडुला (Medulla): हा किडनीचा आतील भाग आहे. यात मूत्र नलिका (renal pyramids) असतात.
- रेनल पेल्व्हिस (Renal Pelvis):
- हा किडनीच्या मध्यभागी असलेला भाग आहे. यात तयार झालेले मूत्र जमा होते.
- नेफ्रॉन (Nephron):
- नेफ्रॉन हे किडनीचे मुख्य कार्यकारी एकक आहे. हे रक्तातील कचरा आणि अतिरिक्त द्रव फिल्टर करतात.
- मूत्रवाहिनी (Ureter):
- ही नळी किडनीमधून मूत्राशयाकडे मूत्र वाहून नेते.
- रेनल आर्टरी (Renal artery):
- ही रक्तवाहिनी किडनीमध्ये रक्त आणते.
- रेनल व्हेन (Renal vein):
- ही रक्तवाहिनी किडनीमधून शुद्ध झालेले रक्त परत नेते.
महत्त्व: - रक्त शुद्ध करणे:
- किडनी रक्तातील विषारी पदार्थ, कचरा आणि अतिरिक्त द्रव काढून टाकतात.शरीरातील रक्ताचे शुद्धीकरण करतात.
- पाण्याचे संतुलन:
- किडनी शरीरातील पाण्याचे प्रमाण नियंत्रित करतात. शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन राखतात.
- रक्तदाब नियंत्रण:
- किडनी रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करतात. रेनीन नावाचे संप्रेरक तयार करतात, जे रक्तदाब नियंत्रित करते.
- लाल रक्तपेशी उत्पादन:
- किडनी एरिथ्रोपोएटिन नावाचे संप्रेरक तयार करतात, जे लाल रक्तपेशींच्या उत्पादनास उत्तेजन देते.
- ऍसिड-बेस संतुलन:
- किडनी शरीरातील ऍसिड आणि बेसचे संतुलन राखतात.
किडनीच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे: - पुरेसे पाणी पिणे. संतुलित आहार घेणे. नियमित व्यायाम करणे. रक्तदाब आणि साखर नियंत्रणात ठेवणे. धूम्रपान आणि मद्यपान टाळणे. किडनीचे कार्य व्यवस्थित चालू राहणे शरीराच्या संपूर्ण आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.
तसेच मधूमेह आणि किडनीचे विकार यातील संबंध आता नव्या रूपात समोर येत असल्याने चिंतेत भर पडली आहे. आधीच भारत मधुमेहींची राजधानी म्हणून ओळखला जातो . १०१ दश लक्ष भारतीय २०३० पर्यन्त मधुमेहाने ग्रस्त असतील. १/३ मधुमेही रुग्णा मध्ये किडनीचे विकार आढळत आहेत.
मधूमेहा मुळे किडनी निकामी होण्याचे प्रमाण वाढत आहे. यावर डायलीसीस अथवा किडनी बदलणे हे उपाय खर्चिक आहेत. यावर उपाय म्हणून भारतातील मेडिकल क्षेत्रातील तज्ञ अनेक उपाय योजना करीत आहेत. तंत्रज्ञानातील प्रगती, ए.आय. चा रोगाचे लवकर निदान करण्यासाठी उपयोग, औषध क्षेत्रातील नवीन संशोधन किडनी तज्ञांना उपलब्ध आहे. SGLT2 inhibitors सारख्या औषधी प्रणाली मुळे उपचार पद्धतीत आमूलाग्र बदल झाले आहेत. परंतु तेवढेच पुरेसे नाही. नॉर्मल व्यक्तीने काय काळजी घेतली पाहिजे तेही तेवढेच महत्वाचे आहे.
नवीन संशोधनानुसार पाणी पुरेसे प्यावे परंतु अती पिऊ नये. शरीरातील विषारी द्रव्ये पुरेसे पाणी काढून टाकते व किडनी स्टोन सारखे आजार होऊ देत नाही ही खरे असले तरी अती पाणी पिण्याने किडनीवर अतिरिक्त ताण येतो. त्यामुळे तसे ८ ग्लास पाणी रोजसाठी पुरेसे असले तरी ते ही वातावरणातील बदल व वैयक्तिक गरज ओळखून त्यात बदल करणे आवश्यक.
नियंत्रित आहार गरजेचा आहे – यात किडनीच्या आरोग्याच्या दृष्टीने ताजी फळे, भाज्या , कडधान्ये आणि पंचण्यास हलकी प्रथिने आवश्यक आहेत. प्रोसेसड फूड टाळणे इष्ट.
मीठाचे प्रमाण कमी करणे, जड चरबी युक्त आहार घेउ नये. पोटॅशियम युक्त फळे जशी केळे आणि पालक सारख्या भाज्या आहारात असल्यास किडनी चे आरोग्य सुधारते. रक्तातील साखरेचे प्रमाण नियमितपणे तपासणे गरजेचे आहे – साखरेचे रक्तातील जास्त प्रमाण किडनी वर परिणाम करू शकते .
त्यामुळे रक्तातील ग्लुकोज चे प्रमाण नियमित तपासावे व आहार त्या प्रमाणे ठेवावा. रक्तदाब नियंत्रणात असणे आवश्यक आहे. त्या साठी आहारातील मीठ कमी करणे, नियमित व्यायाम , ताण तणावाचे योग्य व्यवस्थापन, जंक फूड टाळणे आणि नियमित रक्त दाबाची तपासणी अनिवार्य आहे. वेदनाशामक औषधांचे अति सेवन टाळले पाहिजे या मध्ये ॲस्प्रिन , आयबूप्रोफेन सारखी non-steroidal anti-inflammatory drugs (NSAIDs) दीर्घ काल घेतल्याने किडनी वर परिणाम होत असल्याने सावधानता बाळगावी.
या औषधांनी किडनीस होणारा रक्ताचा पुरवठा कमी होतो आणि त्यामुळे किडनीच्या कार्यावर परिणाम होतो. गरज आहे तेव्हाच ही औषधे व डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली घेणे महत्वाचे आहे.
नियमित व्यायाम आवश्यक आहे त्यामुळे शरीराचे वजन नियंत्रित राहून रक्त दाब कमी होतो, मधूमह कमी होतो व ऋदयरोग ही कमी होतो. आपण पूर्वीच हे पहिले आहे की किडनीच्या आरोग्यावर परिणाम करणारे हेच घटक आहेत. ३० मिनिटे चालणे, योगा करणे , पोहणे किडनीच्या आरोग्यासाठी फलदायी आहे. मद्यपान व्यर्ज करावे अथवा नियंत्रित करावे. धूम्रपान पूर्ण थांबवले पाहिजे – अल्कोहोल मुळे डीहायड्रेशन होऊन किडनी वरील ताण वाढतो धूम्रपानामुळे किडनी चा रक्त पुरवठा कमी होतो व ताण वाढतो . नियंत्रित मद्यपान व पूर्णपणे थांबलेले धूम्रपान यामुळे किडनीचे आरोग्य टिकून राहते. योग्य प्रमाणात नियमित झोप घेतली पाहीजे. कमीत कमी ७ ते ८ तास झोप मिळाली पाहिजे त्यामुळे किडनीतील अशुद्ध द्रव्ये बाहेर काढली जाऊन आरोग्य सुधारते. हाय प्रोटीन व जड आहार कमी करावा .