spot_img
मंगळवार, सप्टेंबर 23, 2025

9049065657

HomeUncategorizedशिवाजी विद्यापीठात १२ मार्चला शरण अध्यासनातर्फे कार्यशाळा

शिवाजी विद्यापीठात १२ मार्चला शरण अध्यासनातर्फे कार्यशाळा

‌‌‍‍कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठ येथील शरण साहित्य अध्यासन, हिंदी अधिविभाग आणि विवेक वाहिनी, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या औचित्याने एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा बुधवार दि. 12 मार्च 2025 रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 4.00 या वेळेत भौतिकशास्त्र अधिविभाग सभागृह, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे पार पडणार आहे. कार्यशाळेचा मुख्य विषय ‘भारतीय महिला : जात-वर्ग-लिंगभाव जाणीव’ हा आहे. यासाठी प्रमुख अतिथी म्हणून कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त मा. के. मंजूलक्ष्मी उपस्थित राहणार आहेत. तर शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. डी. टी. शिर्के हे अध्यक्षस्थान भूषवतील. ई. एफ. एल. युनिव्हर्सिटि, हैद्राबादच्या माजी प्र. कुलगुरू प्रा. डॉ. माया पंडित आणि सेंट्रल युनिव्हर्सिटि ऑफ कर्नाटका, गुलबर्गा येथील प्रा. डॉ. शिवगंगा रूम्मा या कार्यशाळेमध्ये प्रमुख मार्गदर्शक असतील.
       सदर कार्यक्रमात व्याख्याना सोबतच महिला विषयक निवडक आंतरराष्ट्रीय लघुपटांचे प्रदर्शन करण्यात येणार आहे. उमेश मालन दिग्दर्शित ‘गोल्डन टॉयलेट’ हा मराठी लघुपट, फजिल रझाक दिग्दर्शित ‘पिरा’ हा मल्याळम लघुपट तसेच समता जाधव दिग्दर्शित ‘सोच सही, मर्द वही’ हा हिंदी लघुपट दाखविण्यात येणार आहे. या लघुपटांविषयी डॉ. अनमोल कोठाडिया उपस्थितांशी संवाद साधतील. या कार्यशाळेमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील विवेक वाहिनीचे विद्यार्थी,विद्यार्थिनी आणि प्राध्यापक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. सदर कार्यशाळेचा लाभ घ्यावा असे आवाहन शरण साहित्य अध्यासनाच्या समन्वयक डॉ. तृप्ती करेकट्टी आणि विवेक वाहिनी, कोल्हापूरच्या जिल्हा कार्यवाह डॉ. चैत्रा राजाज्ञा यांनी केले आहे.

जिज्ञासूसाठी सदर कार्यक्रमाची पत्रिका खाली देत आहोत.

RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments