गोव्यातील पोर्तुगीजांनी छत्रपती संभाजी राजेंना शह देण्यासाठी औरंगजेबाला मदत करण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे संभाजी महाराजांना गोव्यावर स्वारी करावी लागली. त्यांना रोखण्यासाठी गोव्याच्या पणजी शहराभोवती पोर्तुगीजांनी मजबूत तटबंदी उभारली होती आणि गोव्याचा गव्हर्नर “काउंट दि अल्वोरे” यांनी अनेक तोफा स्वसंरक्षणासाठी सज्ज ठेवल्या होत्या. पण संभाजी महाराजांना हे माहीत होते की गोव्यात शिरून पोर्तुगीजांवर हल्ला करणे कठीण आहे, पण त्यांनी तयारी केली आणि गोव्यावर स्वारी केली. मराठे एवढ्या बेधडकपणे घुसले पोर्तुगीज सैन्याला त्यांना आवरणे कठीण झाले तो हल्ला छत्रपती संभाजी राजेंनी एवढा ताकदीनीशी केला होता की पोर्तुगीज सैन्याची पिछेहाट व्हायला लागली आणि त्रेधातिरपीट उडाली
वरील फोटो मध्ये सोनेरी रंगाच्या पेटीत संत फ्रँसीस झेवियर यांचे पार्थिव ठेवलेले आहे.
आपली हार होणार गोवा हातातून निसटणार हे दिसताच, व्हाइसरॉयने देवा चा धावा करणेसाठी बॉम जीजस चर्च मध्ये जाऊन सेंट फ्रांसीस झेवियर यांची शवपेटी उघडली आणि त्यांच्या पायाशी राजदंड ठेवून गोव्याचे रक्षण करण्याची प्रार्थना केली.पोर्तुगीजांचे नशिब चांगले की अगदी त्याच वेळी मुघली सैन्य स्वराज्यावर चालून येत आहे. ही बातमी संभाजी राजेंना समजली म्हणून ते गोव्याची मोहीम अर्धवट सोडून स्वराज्य रक्षणा करता माघारी फिरले आणि पोर्तुगीजाना वाटले की सेंट फ्रांसीस यांच्या मुळं आपण वाचलो तेव्हा पासून सेंट फ्रँसीस यांना साकडे घालायच्या प्रथेला सुरवात झाली. कोण आहेत हे सेंट फ्रांसीस झेवियर ?

सेंट फ्रँसीस झेवियर्स यांचा फोटो
इसवी सन १५३४ पासून आज ही ख्रिश्चन संत सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे प्रेत गोव्यात जतन करून ठेवले आहे. सेंट फ्रान्सिस झेवियर हे ख्रिश्चन धर्माचे एक महान प्रचारक आणि जेसुइट समाजाचे सहसंस्थापक होते. त्यांचे कार्य विशेषतः भारत, जपान आणि इतर आशियाई देशांमध्ये ख्रिश्चन धर्माच्या प्रसारासाठी महत्त्वपूर्ण ठरले. सेंट फ्रान्सिस झेवियर यांचा जन्म ७ एप्रिल १५०६ रोजी स्पेनमधील नव्हर (Navarre) मधे झाला. त्यांचे मूळ नाव फ्रांसिस्को दे झेवियर असे होते. ते एका श्रीमंत आणि प्रतिष्ठित कुटुंबातील होते. झेवियर यांनी पॅरिस विद्यापीठात शिक्षण घेतले, जिथे ते इग्निशस ऑफ लोयोला (Ignatius of Loyola) यांना भेटले. इग्निशस यांनी त्यांना धार्मिक सेवा करण्यासाठी प्रेरित केले. १५३४ मध्ये, झेवियर आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी जेसुइट समाजाची (Society of Jesus) स्थापना केली. १५४२ मध्ये पोप पॉल III यांनी झेवियर यांना भारत आणि आशियातील इतर भागांमध्ये ख्रिश्चन धर्माचा प्रसार करण्यासाठी पाठवले. ६ मे १५४२ रोजी ते गोवा येथे पोर्तुगीज जहाजाने पोहोचले.
त्यांनी गोवा कॉलेजची स्थापना केली, जे पुढे जेसुइट शिक्षण संस्थांचे केंद्र बनले.स्थानिक लोकांमध्ये ख्रिश्चन धर्माची शिकवण देण्यासाठी त्यांनी अनेक चर्च आणि शाळा स्थापन केल्या. त्यांनी तामिळनाडू आणि केरळच्या किनारी भागांमध्ये (Fishery Coast) धर्मप्रसार केला. ते तमिळ भाषा शिकले आणि स्थानिक लोकांना त्यांच्या भाषेतून धर्माचे शिक्षण दिले. त्यांनी ख्रिश्चन धर्माच्या प्रचारासाठी पोर्तुगीज सरकारला अधिक मदत करण्याची शिफारस केली, ज्यामुळे पुढे गोवा इनक्विझिशन स्थापन झाले.
१५४९ मध्ये झेवियर जपानला पोहोचले आणि त्यांनी तेथे ख्रिश्चन धर्माचा प्रचार सुरू केला. त्यांनी जपानी भाषा शिकली आणि जपानी लोकांसाठी धर्मग्रंथांचे भाषांतर केले. जपानमध्ये ख्रिश्चन धर्माचा पाया घालण्याचे श्रेय त्यांना जाते. १५५२ मध्ये त्यांनी चीनमध्ये धर्मप्रसार करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना मुख्य भूमीवर प्रवेश नाकारला गेला. त्यांची प्रकृती खालावली आणि ते शांगचुआन द्वीप (Shangchuan Island) येथे ३ डिसेंबर १५५२ रोजी निधन पावले. १६२२ मध्ये, पोप ग्रेगरी XV यांनी त्यांना अधिकृतपणे संत घोषित केले.
सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे शरीर अजूनही गोव्यातील बॉम जीसस बॅसिलिका (Basilica of Bom Jesus) मध्ये सुरक्षित ठेवले आहे. दरवर्षी ३ डिसेंबर रोजी जुन्या गोव्यात बॉम येशूच्या बॅसिलिका येथे साजरा केला जातो. या उत्सवापूर्वी ९ दिवसांचे नवे उत्सव आयोजित केले जातात आणि जगभरातील यात्रेकरू त्यात सहभागी होतात. येथे एक भव्य मेळा भरतो जिथे रस्त्यांवर गोड पदार्थ, खेळणी आणि कपडे विकण्याचे स्टॉल लागतात.
वरील फोटो बॉम जीजस बेसलिका चर्च (Basilica of Bom jesus) चे असून तिथेच सेंट फ्रँसीस झेवियार्स यांचे पार्थिव जतन करून ठेवले आहे जुनं गोवा (old goa) या भागात हे चर्च असून पर्यटकांची खूप गर्दी असते. दरवर्षी, 24 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर या कालावधीत हजारो भाविक आणि पर्यटक जुन्या गोव्याला भेटू देतात, जेव्हा सेंट fransis झेवियार यांच्या प्रार्थना सभेचे आयोजन केले जाते आणि त्यानंतर फेस्टला (fest ) सुरुवात होते.