छत्रपती शिवाजी महाराजांनी शतकानुशतके जुनी पराभवाची परंपरा मोडीत काढून जुनी परंपरा संपवली. छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमार, किल्ले, त्यांनी जाणलेले लांब पल्ल्याच्या तोफांचे महत्त्व व त्यांनी आत्मसात केलेले त्यासाठीचे तंत्रज्ञान म्हणजेच त्यातील ‘आत्मनिर्भरता’ , नियोजन व व्यवस्थापन जगापर्यंत पोहोचणे महत्त्वाचे आहे असे उद्गार काढले आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी. छत्रपती शिवाजी महाराजांवरिल ‘युगंधर शिवराय’ या पुस्तकाच्या प्रकाशन वेळी ते बोलत होते.
प्रत्येक बाबतीत देश आत्मनिर्भर व्हावा हे सूत्र त्यांनी देशाला दिले त्यांच्या कल्पना त्यांनी अस्तित्वात आणल्या मात्र आपण अद्यापही अनेक कल्पना लागू करू शकलो नाही असे ते म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांचे दोन गुण तरी अंगी बाळगले पाहिजेत. या युगाचे आदर्श पुरूष म्हणून त्यांचे निदान अनुकरण तरी करावे.
सिकंदरच्या स्वारी पासून भारतावर आक्रमणाचा क्रम सुरू झाला. नंतर इस्लामच्या नावावर मुघलांनी सर्व उध्वस्त करण्यावर भर दिला परंतू छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकामुळे देशातील परतंत्राचे जणू युगच बदलले
छत्रपती शिवाजी महाराजांनी केवल तत्कालीनच नव्हे तर भविष्यातील भारताला देखील दिशा दिली त्यांच्या राज्याभिषेकानंतर अनेकांची सद्दी संपली. छत्रपती शिवाजी महाराजांची राष्ट्रवादीची संकल्पना स्पष्ट होती. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार नवीन पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी शिवचरित्र कीर्तनकार समाजात पाहिजेत कीर्तनातून सामाजिक बदल होतात ही भोळी श्रद्धा नसून ते एक सामाजिक तंत्र आहे. संघाचे काम तत्ववादी असून त्यात व्यक्तीवादास जागा नाही. संघात साकार व्यक्तीमत्वात दोनच व्यक्तीमत्व मानली जातात ते म्हणजे हनुमान व छत्रपती शिवाजी महाराज.
सरसंघचालक मोहन भागवत दिवंगत डॉक्टर सुमंत दत्ता टेकाळे यांच्या ‘युगंधर शिवराय” या पुस्तकाचे प्रकाशन वेळी बोलत होते. त्या वेळी मुधोजीराजे भोसले, पुस्तकाचे संपादक डॉक्टर श्याम माधव धोंड व प्रकाशक सचिन उपाध्याय उपस्थित होते.



