ऐन भडकलेल्या उन्हाळ्यात तापल्या जीवांना थंडावा देउन बच्चे कंपनीच्या सुटीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आणि सर्व फॅमिलीलाच ताजेतवाने करण्यासाठी महाबळेश्वर पर्यटन महोत्सव येत आहे.
✨️’यायलाच लागतय” अशा विविध आकर्षणांनी खचाखच भरलेला हा मेगा महोत्सव 2 मे ते 4 मे दरम्यान आयोजित केलेला आहे. खास ‘फुल’ पर्यटन असलेल्या या महोत्सवात आहे तरी काय👇
पर्यटकांच्या आरामदायक निवासासाठी टेंटस्, खवय्यांच्या जिव्हा तृप्त करणारे राज्यातील विविध ठिकाणचे स्पेशल खाद्यपदार्थ, महाबळेश्वरचे खास आकर्षण असणा-या वेण्णा लेकवरिल नेत्रदीपक लेसर शो व वाॅटर स्पोर्ट्स, महाराष्ट्राची सांस्कृतिक धरोहर असलेल्या लावणी, जागर, गोंधळ यांचे नाशिक ढोलाच्या गजरासह सादरीकरण तसेच स्थानिक बचत गटांचे हस्तकला व विक्री प्रदर्शन, भव्य सुपर ड्रोन शो हे तर या महोत्सवात आहेच या शिवाय ट्रेकिंग राॅक क्लायम्बिंग, घोडेस्वारी, पॅराग्लायडींग देखील आहे. महाबळेश्वरची खासियत स्ट्रॉबेरी कृषी पर्यटनासह , महाबळेश्वर परिसरातील पाचगणी, कास पठार, कोयनानगर, तापोळा, गड-किल्ले, पुरातन मंदिरे दर्शन व इतर पर्यटन स्थळ, दर्शन सहली व 3 मे रोजीच विशेष सांस्कृतिक मिरवणूक यांचा समावेश आहे. स्थानिक लोकसंस्कृतीचा समावेश असलेल्या कार्यक्रमामुळे महोत्सव सर्वसमावेशक होईल. महोत्सवात पर्यटनाचा अविभाज्य घटक असलेले प्रवासी संस्थांचे प्रतिनिधी, ट्रॅव्हल एजंटस्, टूर ऑपरेटर्स, सोशल मेडीया इन्फ्लुएन्सर्स यांना ही आमंत्रित करून त्यांच्यासाठी महाबळेश्वर दर्शन सहल आयोजित केली आहे. महाबळेश्वर पर्यटनासाठी पुरेपूर या महोत्सवाकडे पर्यटक खेचले जाणार हे निश्चित.
महाबळेश्वर मधिल प्रेक्षणीय स्थळांसह स्थानिक खाद्य, कला यासह सांस्कृतिक वारशाची ओळख होउन पर्यटनातही वृद्धी व्हावी हा याचा उद्देश आहे. सातारा जिल्ह्य़ात महाबळेश्वर येथे राज्य शासनातर्फे प्रथमच येवढ्या भव्य प्रमाणात हा महापर्यटन सोहळा साजरा होत आहे.
महाराष्ट्राचे मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच या महाबळेश्वर पर्यटन महोत्सवाच्या लोगो-बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्य मंत्री एकनाथ शिंदे, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर बी एन पाटील, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल, एमटीडीसीचे मुख्यलेखा वित्त अधिकारी जितेंद्र सोनवणे हे उपस्थित होते.