कोल्हापुरातील उद्योगासाठी ४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक : उद्योगमंत्री उदय सामंत

0
171
Google search engine

कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज

उद्योग क्षेत्रात देशात महाराष्ट्र राज्य अग्रेसर असून चार हजार कोटींचे करार करण्यात यशस्वी झाले आहे. उद्योग क्षेत्रावर ८०  ते ८५ % गुंतवणूक करणारे महाराष्ट्र हे  देशातील पहिले राज्य असल्याचे सांगून सामंत म्हणाले, राज्यात मेगा व अल्ट्रा मेगा प्रोजेक्ट आणले आहेत. मागील वर्षापेक्षा तिप्पट गुंतवणूक उद्योग क्षेत्रात वाढली आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातून सुमारे ४० हजार उद्योजक तयार झाले आहेत.

खादी ग्रामोद्योग विभाग विभागामार्फत शुद्ध मध निर्मितीला चालना दिली आहे. हे मध इतर कंपन्यांच्या ब्रँड पेक्षाही चांगले आहे. याच्या माध्यमातून मध उत्पादक शेतकऱ्यांना दरमहा किमान १५,००० रुपये उत्पन्न मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही सामंत यांनी दिली .

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत सहकारी बँकांमधूनही कर्ज पुरवठा होण्याबाबत शासनाने निर्णय घेतला पाहिजे, अशी मागणी प्रकाश आबिटकर यांनी केलि. त्यावर पंधरा दिवसात शासन निर्णय घेतला जाईल, असे सामंत यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम उद्दिष्ट पूर्तीची माहिती दिली. पुणे विभागाचे उद्योग सहसंचालक शैलेश राजपूत यांनी प्रास्ताविक केले. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स उद्योग व कृषीचे अध्यक्ष ललित गांधी, माजी आमदार सुजित मिणचेकर, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजय पाटील आदी उपस्थित होते.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here