कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
कोकणच्या आंब्याची चव सातासमुद्रापार पोहाचली आहे. आंबा ४१ देशात निर्यात केला जातो. कोकणच्या हापूस आंब्याला अमेरिकेत खूप मागणी आहे. भारताने २०२३-२४ आर्थिक वर्षात सुमारे २७,३३० मेट्रिक टन आंब्यांची निर्यात केली आहे, ज्याची किंमत अंदाजे ४७.९८ दशलक्ष अमेरिकी डॉलर (सुमारे ₹३९८ कोटी) होते. फक्त अमेरिकेत २,०४३.६० मेट्रिक टन आंबा जातो. परदेशात पाठवण्यासाठी आंब्कायावर काही विशेष प्रक्रिया आणि नियमांचे पालन करावे लागते, जेणेकरून आंबे ताजे राहतील आणि आयात देशाच्या नियमांची पूर्तता होईल. आंब्याची निर्यात प्रक्रिया कशी आहे ते पाहू.
योग्य जातीचा निवड : परदेशात पाठवण्यासाठी सामान्यतः ‘अल्फान्सो (हापूस)’, केसर, बदामी, बांगनपल्ली अशा जातींची मागणी जास्त असते.
पूर्व-प्रक्रिया : आंबे योग्य पिकलेले असावेत. जास्त पिकलेले नसावेत.
आंबे काढणीनंतर लगेच थंड जागेत ठेवले जातात. आंबे स्वच्छ करून आकारानुसार वर्गीकरण केले जाते. वॅक्सिंग करून पॅकिंग केली जाते.
वाफेच्या प्रक्रियेने निर्जंतुकीकरण : अनेक देशांमध्ये कीटकमुक्ततेसाठी ही प्रक्रिया बंधनकारक असते. भारतात APEDA (Agricultural and Processed Food Products Export Development Authority) प्रमाणित युनिट्स ही प्रक्रिया करतात.
पॅकेजिंग : आंबे मजबूत, हवादार आणि फळांना धक्का बसणार नाही अशा बॉक्समध्ये पॅक करतात. आंतरराष्ट्रीय मानकांनुसार लेबलिंग आवश्यक असते (प्रकार, वजन, देश, प्रक्रिया युनिट इत्यादी माहिती).
थंड साखळी (Cold Chain) व्यवस्थापन : निर्यात करताना थंड तापमानात ट्रान्सपोर्ट करतात जेणेकरून फळे खराब होणार नाहीत.
निर्यातीसाठी परवाने व कागदपत्रे : Phytosanitary Certificate (वनस्पती आरोग्य प्रमाणपत्र), APEDA नोंदणी, बिल ऑफ लॅडिंग, कमर्शियल इनव्हॉईस, पॅकिंग लिस्ट, काही देशांमध्ये विशिष्ट परवाने आवश्यक असतात (उदा. USA साठी USDA APHIS ची गरज असते).
वाहतूक (Transport) : हवाई (Air cargo – ताज्या आंब्यांसाठी प्राधान्य) किंवा समुद्रमार्गे (Sea cargo).
आयात देशाचे नियम : प्रत्येक देशाचे आपले आयात नियम असतात (उदा., US, Japan, Europe यांच्याकडे वेगवेगळे कीटकनियंत्रण, प्रक्रिया आणि दर्जा मानके असतात).
प्रमुख निर्यात देश :
-
अमेरिका: २,०४३.६० मेट्रिक टन
-
न्यूझीलंड: ११०.९९ मेट्रिक टन
-
ऑस्ट्रेलिया: ५८.४२ मेट्रिक टन
-
जपान: ४३.०८ मेट्रिक टन
-
दक्षिण आफ्रिका: ४.४४ मेट्रिक टन